Tue, Jan 21, 2020 11:55होमपेज › National › नरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस 

नरवणे : लष्कर उपप्रमुखपदी मराठी माणूस 

Published On: Jul 23 2019 1:47AM | Last Updated: Jul 23 2019 1:47AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मिरातील घुसखोरांना यमसदनी पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल एम. एम. नरवणे यांची लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नरवणे यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची लष्करप्रमुखपदी निवड होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 37 वर्षांपासून नरवणे लष्करात कर्तव्य बजावत आहेत. इन्फंट्री ब्रिगेडचेही त्यांनी याआधी नेतृत्व केले आहे. दरम्यान, नरवणे यांच्या ठिकाणी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालाकोट मोहीम फत्ते करण्यात चौहान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.