गुड न्यूज! केरळमधील वृद्ध दाम्पत्याची कोरोनावर मात

Last Updated: Apr 01 2020 7:27PM
Responsive image


कोच्ची : पुढारी ऑनलाईन

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका वृद्ध लोकांना असतो आणि जगात अशा लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठेच आहे. मात्र जगभरात अनेक वृद्धांनीही या विषाणूवर यशस्वी मात केलेली आहे. 

इराणमध्ये तर १०३ वर्षे वयाच्या एका आजीबाईंनी कोरोनावर मात केली होती. आता केरळमध्ये ९३ आणि ८८ वर्षे वयाच्या पती-पत्नीने या आजारावर मात केली आहे. अनेक दिवस हे वृद्ध दाम्पत्य हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत होते. आता ते या विषाणूपासून पूर्णपणे मुक्‍त झाले आहेत. हे दोघेही अत्यंत साधा आहार घेतात. हॉस्पिटलमध्येही त्यांनी पझनकांजी (भाताचा पदार्थ), कप्पा आणि फणसाचे गरे असा आहार घेतला होता. 

केरळच्या या वृद्ध दांपत्याला कोरोना विषाणूची लागण गेल्या महिन्यात इटलीतून आलेल्या मुलगा, सून आणि नातवामुळे झाली होती. या जोडप्याला बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.