Tue, Jun 25, 2019 16:09होमपेज › National › मंदिरात पूजेसाठी गेलेले शशी थरुर तोल गेल्‍याने गंभीर जखमी 

मंदिरात पूजेसाठी गेलेले शशी थरुर तोल गेल्‍याने गंभीर जखमी 

Published On: Apr 15 2019 2:38PM | Last Updated: Apr 15 2019 2:20PM


नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरम मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार शशी थरुर सोमवारी (ता.१५) एका मंदिरात पूजा करण्‍यासाठी गेले होते. त्‍यावेळेस ते गंभीर जखमी झाले आहेत. मंदिरात तोल जाऊन पडल्यानंतर त्‍यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचारासाठी त्यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. 

काँग्रेस नेते शशी थरुर मंदिरात गेले होते. यावेळी त्यांची तुला करत असताना अचानक तोल गेल्‍याने खाली कोसळले. त्‍यामुळे ते गंभीर जखमी झाले. यानंतर काही वेळातच त्‍यांना तिरुवनंतपुरम येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले. त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर जखम झाली आहे व सहा टाके पडल्‍याचे सांगण्‍यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी अवस्थेतील शशी थरुर यांचा फोटो समोर आला असून पिवळा कुर्ता घातलेला दिसत आहे. त्याच्या कुर्त्यावर रक्ताचे डागही दिसत आहेत. 

काँग्रेस नेते शशी थरुर मंदिरात तुला करत असताना जखमी झाल्‍याची माहिती समोर आली आहे. तराजूत तुला करून त्या व्यक्तीच्या वजनाइतके साहित्य दान दिले जाते.