Thu, Jan 17, 2019 09:07होमपेज › National › सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मध्यरात्री सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात दुसऱ्यांदा मध्यरात्री सुनावणी

Published On: May 17 2018 8:01AM | Last Updated: May 17 2018 8:02AMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

न्यायसंस्थेच्या इतिहासात काल रात्री दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालय मध्यरात्री सुरु राहीले. देशातील लोक झोपी गेले असताना न्यायालयात सुनावणी सुरु होती. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतरच्या घडामोडी या एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभतील अशाच आहेत. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने निजदला पाठिंबा दिला. मात्र, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्याने काँग्रेसने सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली. मध्यरात्री १ वाजता मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ३ न्यायधीशांचे पीठ स्थापन केले. त्यानंतर २ वाजून १० मिनिटांनी सुनावणी सुरु झाली. पहाटे ५.३० पर्यंत चाललेल्या या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखता येणार नसल्याचे सांगितले. 

भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार असलेले येडियुराप्‍पा यांचा शपथविधी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या निकालावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून समर्थक आमदारांची यादी तयार करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. याप्रकरणी उद्या १०.३० वाजता पुन्‍हा सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात मध्यरात्री सुनावणी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी  २९ जुलै २०१५ ला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय मध्यरात्री सुरु होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेनन यांच्या फाशीच्या आदल्या रात्री याकूबचे वकिल मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात पोहचले होते. सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी फाशीच्या शिक्षेविरोधात दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर याकूबचे वकिल प्रशांत भूषण यांच्यासह १२ वकिल मुख्य न्यायधीशांच्या घरी पोहचले होते. त्यांनी याकूबच्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तात्कालिन सरन्यायाधीश एच एल दत्तू यांनी मुख्य न्यायधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायाधीशांचे पीठ स्थापन केले होते. त्यावेळी मध्यरात्री न्यायधीशांनी सर्वोच्च न्यायालात सुनावणी करताना याकूब मेननची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

वाचा : येडियुराप्‍पांचा शपथविधी रोखता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

Tags : Karnataka, Election, Result, Supreme Court, Seats, Midnight, History,