Sun, May 19, 2019 11:57
    ब्रेकिंग    होमपेज › National › श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर JDSचे ७ सदस्य गायब; कुमारस्वामींचा दावा

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर JDSचे ७ सदस्य गायब; कुमारस्वामींचा दावा

Published On: Apr 22 2019 11:25AM | Last Updated: Apr 22 2019 11:26AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

जगभरातील खिश्चन समाजासाठी अत्यंत पवित्र असलेल्या ईस्टर संडेच्‍या दिवशीच श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटाने रक्तपात झाला. या घटनेबद्दल जगभरातून दुःख व्यक्त केले जात आहे. पण याचे पडसात भारतातदेखील उमटत आहेत. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचे हादरे कर्नाटक राज्याला देखील बसले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर जीडीएसचे (JDS) सात सदस्य गायब झाल्याचा दावा केला आहे. यामुळे कर्नाटकच्‍या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना कुमास्वामी यांनी सांगितले की,जीडीएसचे साम सदस्य श्रीलंका दौऱ्यावर होते. साखळी बॉम्बस्फोटानंतर हे सात सदस्य गायब आहेत. आमच्या पक्षातील सात सदस्य गायब झाल्याने मला धक्का बसला आहे.  त्यामधील दोघेजणांचा मृत्यू झाला असल्याचा संशय आहे. गायब झालेल्या सदस्यांची माहिती मिळण्यासाठी भारतीय उच्चआयाोगांच्‍या संपर्कात असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले.

►श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात जेडीएसच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

जगभरातील खिश्चन समाजासाठी अत्यंत पवित्र असलेल्या ईस्टर संडे दिवशीच श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटाने रक्तपात झाला. चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या तब्बल आठ साखळी बॉम्बस्फोटामधील मृतांचा आकडा २९० वर पोहचला आहे. यात ३ भारतीयांचा समावेश आहे. मृतांमध्ये ३५ हून परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पण या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे हे अद्याप समजलेले नाही.