Thu, Jun 20, 2019 05:03होमपेज › National › द्वेषाचे राजकारण पराभूत व्हावे

द्वेषाचे राजकारण पराभूत व्हावे

Published On: May 23 2019 1:55AM | Last Updated: May 23 2019 1:55AM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

निवडणूक निकालात जे व्हायचे ते होईल; पण द्वेषाचे राजकारण पराभूत होणे गरजेचे आहे, यामुळे फक्त लोकशाही कमकुवत होणार नाही, तर समाजात फूट पडेल, असे मत  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बेगुसराय येथील उमेदवार कन्हैयाकुमार यांनी फेसबूक पोस्टमधून मांडले आहे. 

ते म्हणतात, की नेत्यांच्या राजकारणासाठी आपापसात भिडणार्‍या कार्यकर्त्यांनी एकदा थंड डोक्याने विचार करावा. मतभेदाला गुन्हा किंवा अपमान मानण्याची मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते. ज्या लोकांनी देशप्रेमाला नेताप्रेम केले आहे, त्यांच्यापासून सावध राहा. ज्यांच्याशी राजकारणामुळे भांडणे झाली, त्यांना आज फोन करा, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करा. 

मतभेदांचाही सन्मान करणे हीच लोकशाही आहे. नागरिकांनी द्वेष आपल्या मनातून काढून टाकला, तर समाजात द्वेषाचे राजकारण करणारे हरतील. कन्हैयाविरुद्ध केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह अशी लढत झाल्याने बेगुसरायच्या निकालाकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.