Mon, Mar 25, 2019 22:01होमपेज › National › जया बच्चन होणार श्रीमंत खासदार!

जया बच्चन होणार श्रीमंत खासदार!

Published On: Mar 13 2018 2:05PM | Last Updated: Mar 13 2018 2:05PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

एकेकाळी बॉलिवूडमध्ये छाप सोडणाऱ्या जया बच्चन सध्या राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. समाजवादी पार्टीकडून तब्बल तीनवेळा राज्यसभेच सदस्यत्व भूषवल्यानंतर त्या पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. यंदाच्या निवडणकीत यश मिळवून त्या राज्यसभेच्या इतिहासात एक नवा अध्याय रचतील. चौथ्यांदा राज्यसभेच्या सदस्या म्हणून निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्यांच्या यादीत अव्वल स्थान मिळवतील. 

वाचा: अमिताभ, जया यांच्यावर 1 अब्ज रुपयांचे कर्ज!

राज्यसभेचा अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जया बच्चन यांच्या नावे १ हजार कोटी संपत्ती आहे. आतापर्यंतच्या राज्यसभा सदस्यांमध्ये २०१४ मध्ये भाजपच्या रवींद्र सिन्हा यांनी सर्वाधिक ८०० कोटींची संपत्ती दाखवली होती. त्यामुळे  चौथ्यांदा निवडून येताच सिन्हा यांना मागे टाकून जया बच्चन  सर्वात श्रीमंत  राज्यसभा सदस्य ठरतील.

वाचा: सर्वाधिक जागा मिळूनही भाजपची अडचण; बहुमत मिळणार नाही!

यापूर्वी २०१२ मध्ये  जया बच्चन यांनी  ४९३ कोटी रुपये संपती दाखवली होती. यात १५२ कोटींची स्तावर मालमत्ता आणि २४३ जंगम मालमत्तेचा समावेश होता. नुकत्यात दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रात त्यांनी बच्चन दाम्पत्यांची स्थावर मालमत्ता ४६० असल्याचे सांगितले.