देवदूत मदतीला; काश्मिरात नदीत अडकलेल्या दोघांची थरारक सुटका (video)

Published On: Aug 19 2019 2:43PM | Last Updated: Aug 19 2019 2:43PM
Responsive image
फोटो आणि व्‍हीडिओ ANI वरुन साभार. 


श्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्‍मू काश्‍मीरमधील तवी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्‍याने आज (ता.१९ ) नदीच्‍या पात्रात चार ते पाच जण अडकले. यांना वाचवण्‍यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली.  हवाई दलाच्या हेलिकॉप्‍टरच्‍या सहाय्याने रेसक्‍यू ऑपरेशन राबवण्‍यात आले. 

रेसक्‍यू ऑपरेशनवेळी हेलिकॉप्‍टरच्‍या शीडीचा दोरखंड अचानक तुटला व दोघे नदीत पडले. नदीच्‍या पात्रात पडलेले दोघेही पोहत पाण्‍यातून बाहेर आले. यानंतर दुसर्‍या दोन लोकांना वाचवण्‍यासाठी हवाई दलाकडून रेसक्‍यू ऑपरेशन राबवण्‍यात आले आणि त्‍यांना सुरक्षित पाण्‍यातून बाहेर काढण्‍यात आले. 

या दोन लोकांसाठी हवाई दलाचे जवान दोरखंडच्‍या मदतीने पहिल्‍यांदा खाली गेले व दोघांना सुरक्षितपणे पाण्‍यातून बाहेर काढले. यानंतर हेलिकॉप्‍टर त्यांना घेण्‍यासाठी आले. तवी नदीच्‍या पात्रात अडकलेल्‍या हे लोक मच्‍छीमार असल्‍याचे सांगितले जात आहे. अचानक नदीची पातळी वाढल्‍याने हे लोक या नदीच्‍या पात्रात अडकून पडली होते.