Thu, Apr 25, 2019 07:34होमपेज › National › जम्मू-काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात, १७ ठार

जम्मू-काश्मीरमध्ये बसला भीषण अपघात, १७ ठार

Published On: Sep 14 2018 1:00PM | Last Updated: Sep 14 2018 1:20PMश्रीनगर : पुढारी ऑनलाईन

जम्मू आणि काश्मीरमधील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्‍याचे दिसत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमध्ये मिनी बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १७जणांचा मृत्‍यू झाला आहे तर, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्‍णालययात दाखल करण्यात आले असून, बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. 

हा अपघात किश्तवाडपासून २० किलोमिटर अंतरावर ठकुराई भागात शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी झाला. एक मिनी बस (क्र. जेके17-0662 ) प्रवाशांना घेवून केशवानकडून किश्तवाडकडे निघाली होती. या बसरमधून २४ प्रवाशी प्रवास करत होते. ठकुराई भागात खराब रस्‍त्‍यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्‍त्‍यापासून ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यात ११७ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती समजताच त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेत बचाव आणि मदत कार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी तात्‍काळ काश्मीरमधील मेडीकल कॉलेजध्ये दाखल केले.