Tue, Oct 24, 2017 16:54होमपेज › National › रेल्वे प्रवासात आता पेपरलेस ओळखपत्र 

रेल्वे प्रवासात आता पेपरलेस ओळखपत्र 

Published On: Sep 13 2017 6:49PM | Last Updated: Sep 13 2017 6:52PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.भारतीय रेल्वेने पेपरलेस तिकीटानंतर आता पेपरलेस ओळखपत्राची सुरुवात केली आहे.यापुढे तुमचा मोबाईल हाच तुमच्या ओळखपत्राचा पुरावा असेल.भारतीय रेल्वे मंत्रालयाने एम-आधार हा प्रवासादरम्यानचा  ओळखीचा पुरावा म्हणून दाखवण्यास मान्यता दिली आहे.   

रेल्वे प्रवासादरम्यान ओळखपत्राचा पुरावा सोबत ठेवावा लागतो. तिकीत मोबाईलवर दाखवल्यानंतरही ओळखपत्र देखील दाखवावे लागते. आता मात्र तुमच्या मोबाईलमधील तिकीट आणि त्याच मोबाईलमधील आधारकार्ड तुम्ही टिसीला दाखवू शकता. संबंधित व्यक्ती मोबाईलमधील एम-आधार ओळखपत्राचा पुरावा दाखवू शकतो. आरक्षण करण्यात आलेल्या सर्व श्रेणीसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.  

क्लिक करा> mAadhaar ॲप लाँच; तुमचे आधार, तुमच्या मोबाइलवर

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एम-आधार हे ॲप जुलै महिन्यात लॉन्च केले होते. या ॲपच्या मदतीने व्यक्ती स्वत:चे आधार डाऊनलोड करून घेऊ शकते. 

संबंधित बातम्या-
देवाला भेटायचे आहे तर आधार कार्ड हवे!
असे करा आधार आणि मोबाईल लिंक