Sun, Aug 25, 2019 01:52होमपेज › National › विंग कमांडर अभिनंदन यांची सुरक्षेसाठी बदली

विंग कमांडर अभिनंदन हवाई दलात परतणार पण..

Published On: Apr 20 2019 6:59PM | Last Updated: Apr 20 2019 7:05PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानी विमान पाडणारे भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची सुरक्षेच्या कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांना काश्मीर खोऱ्याच्या बाहेर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली. अभिनंदन यांना श्रीनगर हवाई तळावरून पश्चिम विभागातील एखाद्या महत्त्वाच्या हवाई तळावर पाठवण्यात येणार आहे. 

अभिनंदन यांच्या हवाई दलात परतण्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी करून पुन्हा सामावून घेण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला. त्यानुसार ते पुन्हा आपल्या कार्याची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, काश्मीरमध्ये त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन हवाई दलाने त्यांना पश्चिम विभागात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून कारवाई केली. त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याची तयारी केली. त्यासाठी पाठवलेल्या एफ ६० विमानांना भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पिटाळून लावले. अभिनंदन यांनी शत्रूचे विमान पाडले. परंतु, त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. परंतु, त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले आणि मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले होते.