कोरोनाचा पुन्हा रेकॉर्ड ब्रेक उद्रेक

Last Updated: Jun 03 2020 12:13PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (दि.3) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 24 तासात आतापर्यंतचा सर्वात मोठा स्पाईक नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासात भारतात 8 हजार 909 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातीली एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा  2 लाख 7 हजार आणि 615 वर पोहचला आहे. तर भारतात कोरोनामुळे एकूण 5 हजार 815 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांचे कोरोना मीटर सुरुच; गेल्या २४ तासात ४७ पॉझिटिव्ह

#CycloneNisarga कोरोना संकटात 'निसर्ग' चक्रीवादळाचे अस्मानी संकट! (photos)

भारतात सध्या 1 लाख 1 हजार 497 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 1 लाख 303 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. भारतातील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा चांगला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचा आकडा हा 72 हजार 300 वर पोहचला आहे. तर तामिळनाडूचा आकडा हा 24 हजार 586 वर पोहचला आहे.