Sun, Jul 05, 2020 23:10होमपेज › National › सीमा वादावर भारत-चीनची आज महत्त्वाची बैठक

सीमा वादावर भारत-चीनची आज महत्त्वाची बैठक

Last Updated: Jun 06 2020 10:00AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि चीनचे द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पूर्वोत्तर लडाखमध्ये उभय देशांचे सैन्य आमनेसामने आल्याने त्यामध्ये अधिकच भर पडली आहे. त्यामुळे भारताकडून चर्चेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय सीमेवरील चुशुल मोलडो या ठिकाणी उभय देशांच्त्‌  उच्चस्तरीय सैन्य अधिकाऱ्यांची बैठक आज (ता.०६) होत आहे.  

भारताकडून या चर्चेचे नेतृत्व १४ संघटनांचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग करतील. चीनकडून तिबेट लष्करी जिल्ह्याच्या कमांडर चर्चेसाठी उपस्थित असतील. विभागीय लष्करी कमांडरांकडून अनेक पातळ्यांवर चर्चा होऊनही कोणताही सकारात्मक तोडगा निघालेला नाही.  

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय शिष्टमंडळाकडून पूर्वोत्तर लडाखमध्ये परिस्थिती पूर्ववत जशी होती तशीच ठेवण्यावर भर राहिल. त्याचबरोबर भारताकडून लडाख विभागात चीनी सैन्यांची मोठ्या प्रमाणात तुकड्यांची जमवाजमव सुरु आहे, त्याला विरोध केला जाईल. तसेच भारताकडून लडाखमध्ये भारताकडून ज्या पायाभुत सुविधांचा विकास सुरु आहे त्याला चीनने कोणत्याही प्रकारचा विरोध करण्यात येऊ नये आदी मुद्यावर चर्चा केली जाईल. 

चीनी सैन्याकडून अडचण होईल अशा पद्धतीने प्रत्यक्ष सीमा रेषेवर पेट्रोलिंग सुरु आहे. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे. त्यामुळे भारतीय सैन्यानेही कडक भूमिका घेत चीनी हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.