Sat, May 25, 2019 10:32होमपेज › National › ‘UNच्या हेतूवर शंका; काश्मीरबाबत चुकीचा अहवाल’

‘UNच्या हेतूवर शंका; काश्मीरबाबत चुकीचा अहवाल’

Published On: Jun 14 2018 5:26PM | Last Updated: Jun 14 2018 5:26PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताने काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालाला चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कथित स्वरुपाचे मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हा अहवाल चुकीचा असून एका विशिष्ट उद्देशाने तयार केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून पुर्वग्रहदुषित भावनेने हा अहवाल तयार करण्यात आला असून खोट्या कथा तयार करण्याचा हा प्रयत्न असून काश्मीर हा पूर्णपणे भारताचा भाग असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने आज एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर दोन्ही ठिकाणी मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची आंततराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे. हा आरोप भारताच्या स्वायत्ततेवर आणि स्वातंत्र्यावर हल्ला करणारा असल्याचे भारताने म्हटले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळून लावत राष्ट्रसंघाच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून जाणीवपुर्वक एकत्रित केलेली माहिती खोटी आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानने भारताच्या एका भागावर बेकायदेशीर हक्क सांगितला जात असल्याचे भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघासह जगाला ठणकावून सांगण्यात आले.