Thu, Dec 13, 2018 23:33होमपेज › National › महागाईने कंबरडे मोडले : पाच महिन्यातील उच्चांक गाठला 

महागाईने कंबरडे मोडले : पाच महिन्यातील उच्चांक गाठला 

Published On: Jul 12 2018 8:24PM | Last Updated: Jul 12 2018 8:24PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गेल्या पाच महिन्यांमधील महागाईने विक्रम मोडीत काढत उच्चांक गाठला आहे. जून महागाई दर तब्बल ५ टक्क्यांवर पोहोचला आहे. केद्र सरकारकडून ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. मे महिन्यात महागाई दर ४.८७ टक्के होता, तर गेल्यावर्षी जुनमध्ये हाच दर १.४६ टक्के होता. या वर्षाच्या सुरवातीला महागाई दर पाच टक्क्यांच्या वर पोहोचला होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या वाढत्या किंमतीही महागाईला कारणीभूत ठरत आहेत. जून महिन्यात कपडे व चपलांमध्ये महागाई  दर ५.६७ टक्क्यांवर पोहोचला, तह गृहनिर्माण ८.४५ टक्क्यांवर गेला. मागील महिन्याच्या तुलनेत या दोन्ही क्षेत्रातील महागाईने गाठलेला उच्चांक आहे.

देशातील सर्वोच्च बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून  (आरबीआय) महागाईबाबत जो अंदाज वर्तविण्यात आला होता त्याच्या तुलनेत महागाई दर जास्त आहे. आरबीआयकडून महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण जून महिन्यात हा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.