Thu, Mar 21, 2019 01:00होमपेज › National › मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा प्रबळ- सर्व्हे

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा प्रबळ- सर्व्हे

Published On: Nov 08 2018 10:05PM | Last Updated: Nov 08 2018 10:11PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची चिन्हे आहेत. मात्र राजस्थानमध्ये भाजपाला दणका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंजनं केलेल्या सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव ( केसीआर ) पुन्हा एकदा सत्ता स्थापन करतील असा अंदाज आहे. 

इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज (PSE) तर्फे हा सर्व्हे करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला विजय मिळण्याची शक्यता असून, त्यांना ५५ टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाला ५२ टक्के विजय मिळण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीला विजय मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला या दोन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवण्याची शक्यता आहे. 

सध्या देशामध्ये निवडणुकांचे वातावरण तापायला सुरु झाले आहे. मध्यप्रदेश, राजस्तान, तेलंगणा, छत्तीसगड येथे विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. याच धर्तीवर इंडिया पाॅलिटिकल स्टाॅक एक्सचेंज तर्फे मतदारांचा कल तपासण्यात आला आहे. या सर्व्हे वरुन पुन्हा एकदा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजपाचा विजय हाेईल असा अंदाज आहे. मात्र राजस्थान भाजपाच्या हातातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.