Tue, Sep 17, 2019 08:46होमपेज › National › 'भिकारी' हा ट्रेंड पाकच्या पंतप्रधानांसाठी?

'भिकारी' हा ट्रेंड पाकच्या पंतप्रधानांसाठी?

Published On: Aug 19 2019 10:47AM | Last Updated: Aug 19 2019 10:47AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाक आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विविध व्यासपीठांवर मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात भूमिका मांडत आहे. पण प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान तोंडावर आपटत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पदरी अपयश पडले. पाकच्या या सर्व घडामोडींची दखल गुगलनेही घेतली. 'भिकारी' हा शब्द सर्च करताच इम्रान यांचे फोटो येत आहेत. त्यामुळे गुगलकडूनही इम्रान यांची खिल्ली उडवली जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

इंटरनेटवर भिकारी हा शब्द सर्च केला तर इम्रान खान यांचा हातात कटोरा घेतलेला फोटो समोर येत आहे. या इमेजला मॉर्फ्ड करण्यात आलेले आहे. या फोटो व्यतिरीक्त यासोबत त्यांचे भाषणावेळचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. सध्या भिकारी हा ट्विटरवर ट्रेंड सुरू आहे.  

पाकने याची दखल घेतली असून गुगलचे सीईओ सुंदर पिचई हे जबाबदार असल्याचा दावा केला आहे. कारण पिचई हे भारतीय असल्याने गुगलवर असे होत आहे. असे पाकने म्हटले आहे. मात्र, गुगलकडून यासंदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आलेला नाही. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex