Sat, Jan 25, 2020 06:45होमपेज › National › 'मोदी सरकारकडून सीबीआय, ईडी, माध्यमांचा गैरवापर' 

'मोदी सरकारकडून सीबीआय, ईडी, माध्यमांचा गैरवापर' 

Published On: Aug 21 2019 2:06PM | Last Updated: Aug 21 2019 2:09PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर 'आयएनएक्स' मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने चिदंबरम गायब झाले असून त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी ट्विट करून पी. चिदंबरम यांची पाठराखण करताना केंद्रीय तपास संस्थांचा तसेच माध्यमांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की मोदी सरकारकडून ईडी, सीबीआय आणि काही माध्यम संस्थाचा गैरवापर करून चिदंबरम यांच्या प्रतिमेची हत्या केली जात आहे. मी या घटनेचा कठोर निषेध करत आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. 

उच्च विद्याविभूषित आणि राज्यसभेचे सदस्य असलेल्या पी. चिदंबरम यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री पदासह अनेक दशकांपासून देशाची सेवा केली आहे. न घाबरता ते सध्याच्या सरकारचे अपयश जनतेसमोर मांडत आहेत. हेच सत्य त्‍यांना खटकत असल्याने त्यांना त्रास दिला जात आहे. त्‍यामुळेत ते सूड उगवत आहेत. मात्र आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत. निकाल काही येणार असला तरी आम्ही निरंतर लढा देत राहू, असे प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे.