Sat, Jul 04, 2020 08:57होमपेज › National › 'फ्लाईंग बुलेट'ची 18 वी स्क्वॉड्रन कार्यान्वित होणार

'फ्लाईंग बुलेट'ची 18 वी स्क्वॉड्रन कार्यान्वित होणार

Last Updated: May 27 2020 1:52PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी आज (दि. 27) सुलूर (तामिळनाडू) एअरबेस वर 'फ्लाईंग बुलेट' 18 वी स्क्वॉड्रन कार्यान्वित करण्याचे संकेत दिले. ही स्क्वॉड्रन भारतीय बनावटीची हलकी लढाऊ विमाने तेजसने सज्ज असणार आहे. भारतीय हवाई दलातील ही दुसरी स्क्वॉड्रन आहे जी भारतीय बनावटीची तेजस विमाने वापरणार आहे.  

वाचा : युद्धाची तयारी जोरात करा; चीनी सैन्याला शी जिनपिंग यांच्याकडून फतवा!

या स्क्वॉड्रनची स्थापना 15 एप्रिल 1965 रोजी करण्यात आली होती. त्यावेळी याचा मोटो 'तीव्र आणि निर्भय' असा होता. ही स्क्वॉड्रन याआधी मिग-27 विमाने वापरत होती. पण यावर्षी 1 एप्रिल पासून या स्क्वॉड्रनची पुर्नबांधनी करण्यात आली आहे. या स्क्वॉड्रनने 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात सहभाग नोंदवला होता. या युद्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या फ्लाईंग ऑफिसर निर्मल जीत सिंग सेखोन यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सर्वात पहिल्यांदा श्रीनगरमध्ये लँड आणि ऑपरेट केल्याने या स्क्वॉड्रनला 'काश्मीर खोऱ्याचे रक्षक' या टोपण नावानेही ओळखले जाते. 

वाचा : देशांतर्गत विमानसेवा सुरु होऊन दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत विमानातच सापडला कोरोनाग्रस्त!

आता ही स्क्वॉड्रन संपूर्ण भारतीय बनावटीची तेजस विमाने घेऊन आकाशात झेपावणार आहे. तेजस हे भारतीय बनावटीचे चौथ्या जनरेशनचे टेललेस डेल्टा विंग विमान आहे. हे विमान फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टम, इंटिग्रेटेड डिजीटल एव्हिओनिक, मल्टीमोड रडारने सज्ज आहे. तसेच त्याची बनावट ही काम्पोजीट मटेरियलची आहे. हे चौथ्या जनरेशनचे सर्वात हलके आणि सर्वात लहान लढाऊ विमान आहे.