Thu, Jun 27, 2019 17:48होमपेज › National › प्रस्थापित राजकीय पक्षात प्रवेश नाही: शाह फैसल

प्रस्थापित राजकीय पक्षात प्रवेश नाही: शाह फैसल

Published On: Jan 11 2019 5:24PM | Last Updated: Jan 11 2019 5:28PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारतीय प्रशासकीय सेवेतील( IAS) अधिकारी तसेच २०१०च्या बॅचचे टॉपर शाह फैसल यांनी नोकरीला राम राम ठोकल्यानंतर ते लोकसभेच्या निवडणुकी उतरणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, शाह फैसल यांनी सध्या राजकारणात जाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. शाह फैसल हे जम्मु आणि काश्मीर मधील पहिलेच आयएएस अधिकारी आहेत. 

शाह यांनी  अल्पसंख्याक भारतीय मुस्लीम आणि जम्मू काश्मीरमधील हत्याप्रकरणांच्या निषेधार्थ ९ जानेवारीला नोकरीला राजीनामा दिला. ही माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करून देत त्यामागचे कारणदेखील स्पष्ट केले होते. फैसल यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, जम्मू काश्मीरमध्ये हत्येच्या घटना वाढत आहेत. मात्र, यावर सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. या निषेधार्थ मी माझी नोकरी सोडत आहे.  

हिंदुत्ववादी शक्तींकडून भारतीय मुस्लिमांना दुय्यम दर्जाची वागणूक दिले जात आहे. तसेच ज्वलंत राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात द्वेषाचे वातावरण आणि असहिष्णुता वाढली आहे. याचा निषेध करत  मी नोकरीला राम राम ठोकत आहे. असे त्यांनी नमुद केले होते. 

त्यांच्या या पोस्टनंतर शाह फैसल आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून ते नॅशनल कॉन्फरन्समध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण शाह यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.