होमपेज › National › ४.५ रिश्‍टर स्‍केल भूकंपाची नोंद

हिमाचल : चंबामध्‍ये पुन्‍हा भूकंपाचे धक्‍के

By | Publish Date: Jul 21 2017 2:06PM
यापुर्वी अनेकदा याच भागात सौम्‍य भूकंपाचे धक्‍के


शिमला : वृत्तसंस्‍था  

हिमाचल प्रदेशच्‍या चंबा जिल्‍ह्यात आज सकाळी भूकंपाचे धक्‍के बसले. यामध्‍ये कोणतीही जीवितहानी किंवा मानहानी झाली नाही. ४.५ रिश्‍टर स्‍केल भूकंपाची नोंद करण्‍यात आल्‍याचे सुत्रांनी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाच्‍या शिमला कार्यालयाने दिलेल्‍या माहितीनुसार, आज सकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी जम्‍मू-काश्‍मीर सीमेनजीक हिमाचल प्रदेशाच्‍या चंबा जिल्‍ह्यात भूकंपाचे धक्‍के बसले. 

यापुर्वी अनेकदा याच भागात सौम्‍य भूकंपाचे धक्‍के बसले आहेत. अजूनही भूकंपाचे धक्‍के जाणवत असल्‍याने येथील नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.