Sun, May 31, 2020 00:38होमपेज › National › देशात कोरोना बाधितांचा आकडा सव्वालाखाच्या पार

देशात कोरोना बाधितांचा आकडा सव्वालाखाच्या पार

Last Updated: May 23 2020 10:53AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या रूग्ण संख्येने उच्चांकी गाठली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ६ हजार ६५४ नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील रूग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०१ वर पोहचली आहे. 

कोव्हिड-१९ मुळे शुक्रवारी (दि. २२) तब्बल १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात ३ हजार ७२० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे करोनाच्या महासाथीचा प्रादुर्भावाचा वेग कमी करण्यात मोठे यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

सर्वाधिक बाधित राज्यामधील महाराष्ट्रातील एकूण प्रकरणे, ४४ हजार ५८२ पर्यंत पोहोचली आहेत, तर तामिळनाडूमध्ये १४ हजार ७५३ वर पोहचली आहे. २ हजारहून अधिक कोरोना बाधितांच्या रूग्णात वाढ होण्या हा सलग सहावा दिवस आहे.

करोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरांमध्ये झालेला आहे. करोनाचे ८० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आढळले आहेत.