Tue, Nov 20, 2018 01:10होमपेज › National › जम्मूमध्ये ‘हाय अ‍ॅलर्ट’

जम्मूमध्ये ‘हाय अ‍ॅलर्ट’

Published On: Sep 13 2018 1:51AM | Last Updated: Sep 12 2018 8:59PMजम्मू : वृत्तसंस्था

जम्मूमध्ये जवानांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर जम्मूमध्ये हाय अ‍ॅलर्ट लागू करण्यात आला आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील महत्त्वांच्या आणि संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. विशेष करून जम्मू परिसर आणि जम्मू ते श्रीनगर महामार्गावर ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेल्या भागांमध्ये माता वैष्णव देवी देवस्थानकडे जाणार्‍या महामार्गाचाही समावेश आहे. जम्मू ते श्रीनगर या महामार्गावरील चौकशी नाक्यावर ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. 

या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी ट्रक घटनास्थळी सोडून तेथून पळ काढला. भारतीय लष्कराने तो ट्रक ताब्यात घेतला आहे. तसेच पसार झालेल्या दहशतवाद्यांचा कत्रा परिसरात शोध घेतला जात असून, तेथेही हाय अ‍ॅलर्ट लागू केला गेला आहे.