Tue, Oct 24, 2017 16:57
29°C
  Breaking News  

होमपेज › National › केरळमध्ये 'गाजा स्ट्रीट' : चौकशी सुरू

केरळमध्ये 'गाजा स्ट्रीट' : चौकशी सुरू

By | Publish Date: Jul 21 2017 2:06PM

कासरागोड : वृत्तसंस्था

केरलमधील कासरागोड नगरपालिकेच्या तिरूती वार्डमधील एका गल्‍लीचे नाव गाजा स्ट्रीट ठेवण्यात आले आहे. यामुळे हा परिसर सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आला आहे. इस्त्राईलमधील गाजा पट्टी हा परिसर वादातीत आहे.

सुरक्षा यंत्रणानी याविषयी प्रतिक्रीया देताना यामागे धार्मिक कट्टरपंथीय असल्याचे सांगितले. राज्यातील २१ युवक मागील वर्षापासून बेपत्ता असल्याचेही यावेळी सांगण्यातड आले. 

तिरूत्तीमधील जामा मशीदजवतळील मार्गाचे नावही मे महिन्‍यात गाजा ठेवण्यात आले होते. याचे उद्‌घाटन कासरगोडच्या जिल्‍हा पंचायत समितीच्या अध्यक्ष एजीसी बशीर यांनी केले होते. याबद्दल त्‍यांनी या नावबदलाविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे त्‍यांनी सांगितले. नगरपालिाकेच्या अधिकार्‍यांनीही या मार्गाचे नाव बदलाविषयी प्रशासनाकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. 

बैठकीत प्रस्तावाच नाही

ज्या परिसरातील मार्गाचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठी बैठकीसमोर प्रस्ताव ठेवावा लागतो. तो मंजूर झाल्यानंतर नावात बदल करता येतात मात्र या बदलाबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगण्यात आले.