Tue, Jun 02, 2020 10:42होमपेज › National › पंतप्रधान मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, पूरग्रस्तांबद्दल सहवेदना

पंतप्रधान मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, पूरग्रस्तांबद्दल सहवेदना

Published On: Aug 15 2019 8:11AM | Last Updated: Aug 15 2019 8:43AM

लाल किल्ल्यावरुन भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात एक देश एक संविधान याचा पुनरुच्चार केला. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने एक देश एक संविधान ही संकल्पना आज साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय विरोधकांनाही हे कलम नकोच होते. मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी याचा विरोध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सुरुवातीलाच देशातील पूरग्रस्तांच्याबद्दल सहवेदना व्यक्त केली. पूरग्रस्तांच्या आपत्कालिन परिस्थितीत आपण त्यांच्याबरोबर असल्याचे मोदींनी सांगितले. त्याचवेळी पाण्याच्या नियोनावरही त्यांनी भर दिला पाहिजे अशी आशा व्यक्त केली.त्याच अनुषंगाने जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केल्याचे ते म्हणाले.  देशाचा विकास सर्वसमावेश झाला पाहिजे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हेच प्रयत्न यापुढेही कायम राहतील असेही ते म्हणाले. मुस्लिम महिलांच्यासाठी तीन तलाकची प्रथा ही डोक्यावर टांगती तलवार होती. त्यामुळे मुस्लिम माता भगिनी कायमच एका अनामिक दडपणाखाली राहात होत्या. त्याची आता मुक्ती झाली आहे असेही मोदींनी सांगितले. तीन तलाकची प्रथा कायद्याने रद्द केल्याने मुस्लिम महिलांचा श्वास मोकळा झाल्याचे ते म्हणाले.

आज लोकसंख्येचा प्रश्न मोठा आहे. लोकसंख्या विस्फोट रोखण्याची गरज आहे. त्यामुळे छोटी कुटुंबे असणारे तसेच ती छोटी राखणारे एका अर्थाने देश विकासात भर घालत आहेत. ते देशभक्तीचा दाखला देत आहेत असेही मोदींनी सांंगितले. लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी देशवासियांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

अनावष्यक कायदे रद्द करण्याचे काम सरकारने केले
लोकांच्या स्वप्नांना सरकारने बळ दिले, विकासाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दिली
सरकारची भूमिका न्यूट्रल असेल सरकारचा दबावही असणार नाही, सरकारचा अभावही वाटणार नाही
लोकांच्यासाठी सरकार करत असलेली कामे लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्नशील
व्यवसाय करण्यातील अडचणी दूर करण्याचे काम, सुलभीकरणाचा प्रयत्न
लोकसंख्या विस्फोटावर उपाय गरजेचा, कुटुंब नियोजन हाही देशविकास
जल जीवन मिशनवर काम करणार, पाण्याचे महत्व ओळखण्याचे आवाहन
पूरग्रस्तांच्याबद्दल मोदींनी व्यक्त केली सहवेदना, जलसंवर्धनासाठी चळवळीचे आवाहन
कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये मोकळा श्वास
कलम ३७० कायमस्वरुपी का केले नाही, मोदींचा सवाल
जम्मू-काश्मीरमधील भ्रष्टाचार नवीन व्यवस्थेमुळे कमी होणार
७० वर्षात जे झाले नाही ते फक्त ७० दिवसात करुन दाखवले
आपण बालविवाह, सती प्रथा बंद केली, तिहेरी तलाक का बंदी त्याचेच पुढचे पाऊल
जनतेची कामे करणे हाच एकमेव उद्देश
कलम ३७० हटवण्याचा निर्णय पहिल्या १० आठवड्यात घेतला
समस्या टाळणे आणि समस्या टिकवणे हे तत्वात बसत नाही
तिहेरी तलाक राजकीय निर्णय नव्हे, समानतेसाठी घेतलेला निर्णय
तिहेरी तलाकबदद्ल मुस्लिम महिलांच्या मनात भीती होती
सब का साथ, सब का विकासवर देशवासीयांनी विश्वास दाखवला
पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असल्याची मोदींची भावना
कलम ३७० रद्द करुन वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकारण्याकडे एक पाऊल
स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या, प्राणांची आहुती दिलेल्यांचे स्मरण
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजवंदन