होमपेज › National › पंतप्रधान मोदींची चाहत्याने केली नक्कल (Video)

पंतप्रधान मोदींची चाहत्याने केली नक्कल (Video)

Published On: Jun 14 2018 6:11PM | Last Updated: Jun 14 2018 6:02PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर फिटनेस चँलेंज पूर्ण करत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात पंतप्रधान व्यायाम आणि योगासने करताना दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. त्यांनतर पंतप्रधान मोदींनी आपला व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या या व्हिडिओनंतर तामिळनाडुतील एका चाहत्याने त्यांच्यासारखाच एक व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ त्याने पंतप्रधान मोदींना अर्पण केला आहे.

फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, मी पंचतत्वे असलेल्या ट्रॅकवरुन चालतो ज्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश यांचा समावेश आहे. यामुळे मन प्रसन्न होते. त्याचबरोबर श्वाच्छोश्वासचाही व्यायाम करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मोदींच्या चाहत्यानेही हुबेहुब व्हिडिओ शेअर केला आह. त्यात त्याने ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी व्यायाम केला त्याची नक्कल केली आहे. 

यापूर्वी केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्विटरवर फिटनेस चॅलेंजे देत व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी पुश-अप्स मारल्या होत्या. आपल्या तंदुरुस्तीचे रहस्या व्यायाम असल्याचे सांगत त्यांनी फिटनेस चॅलेंज दिले होते. त्यानंतर अनेक खेळाडू, अभिनेते, राजकीय नेत्यांनाही फिटनेस चॅलेंजे देण्यात आले होते.