Tue, Oct 24, 2017 16:53होमपेज › National › पंतप्रधानपदी ‘मनमोहन’ योग्य होते : मुखर्जी

पंतप्रधानपदी ‘मनमोहन’ योग्य होते : मुखर्जी

Published On: Oct 13 2017 4:02PM | Last Updated: Oct 13 2017 4:02PM

बुकमार्क करा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन वृत्त

तत्कालीन परिस्थितीत डॉ. मनमोहन सिंह यांची पंतप्रधानपदी निवड करणे निर्णय अगदी योग्य होता, असे मत माजी राष्ट्रापती प्रणव मुखर्जी यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये व्यक्‍त केले.

२००४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला जनतेने विजयी केले. यावेळी सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदाची संधी दिली, यावर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, मनमोहन सिंह यांची पंतप्रधानपदी निवड झाली, यामुळे मी नाराज झालो नाही, तर भारताचा पंतप्रधान बनण्यासाठी मी योग्य नाही, असाच मी विचार केला. 

ते म्हणाले, मी अनेक वर्षे राज्यसभा सदस्य होतो. केवळ २००४ मध्येच मी लोकसभा निवडणूक जिंकलो. हे कारणही माझी पंतप्रधानपदी निवड न होण्याचे असू शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. तसेच मला हिंदी भाषेचे ज्ञान कमी होते. त्यामुळे हिंदी भाषेबाबत ज्याला कमी ज्ञान आहे, त्या व्यक्‍तीने देशाचा पंतप्रधान होऊ नये. 

जीएसटी चांगला, पण...

पेट्रोल दरवाढ आणि जीएसटीवर प्रणव मुखर्जी म्हणाले, याबाबत भिती पसरविली जाऊ नये. तसेच यामध्ये सातत्याने बदल करणेही योग्य नाही. जीएसटी करप्रणाली चांगली आहे; पण ती लागू करत असताना अडचणींचा सामना टाळणे अशक्य असल्याचे त्यांनी व्यक्त केले.