Mon, Aug 26, 2019 00:02होमपेज › National › दिल्ली पोलिसाच्या 'दिवट्या'चे कृष्णकृत्य;महिलेला केली बेदम मारहाण; आता बलात्काराचा गुन्हा दाखल 

दिल्ली पोलिसाच्या 'दिवट्या'चे कृष्णकृत्य;महिलेला केली बेदम मारहाण; आता बलात्काराचा गुन्हा दाखल 

Published On: Sep 14 2018 8:28PM | Last Updated: Sep 14 2018 8:28PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

दिल्ली पोलिसाच्या दिवट्या मुलाचा महिलेला बेदम मारहाण करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गंभीर दखल घेत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. राजनाथसिंह यांनी दिल्ली पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांना कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. ट्विटरवरून राजनाथसिंह यांनी ही माहिती दिली. 

महिलेला मारहाण करत असलेल्या त्या व्हिडिओची मी दखल घेतली असून त्या संदर्भात दिल्ली पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे, या प्रकरणी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी  ट्विटरवरून सांगितले. मारहाण करणारा तो युवक दिल्ली पोलिसाचा मुलगा आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग तसेच धमकीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपी तरुणाने त्या महिलेला बेदम मारहाणीचा व्हिडिओ त्याच्या मैत्रिणीला दाखवला. त्यानंतर तिने तक्रार नोंदवली. जर त्या पीडित मुलीने त्याच्या सुचनांचे पालन केले नाही, तर अशाच पद्धतीने मारहाण करायचा असे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्या आरोपी तरुणाविरुद्ध दुसऱ्या एका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या महिलनेसुद्धा तो मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुन्हा दाखल केला. त्या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्या पीडितेला दोन सप्टेंबरला आरोपीने मित्राच्या घरी बोलवून बलात्कार केला होता. १३ सप्टेंबरला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दखल घेतली.

दिल्ली पोलिसांनी पीडित तरुणीशी संपर्क साधला होता पण तिने आज तक्रार दिली. आरोपी तरुणाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. एफआयआरमध्ये पीडितेने आरोप केला आहे की त्या आरोपी तरुणाने मित्राच्या कार्यालयात बोलवून त्याने माझी परवानगी नसतानाही अनैतिक संबंध ठेवले व मी गुन्हा नोंदवणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याने बेदम मारहाण केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.