Tue, Jan 21, 2020 11:41होमपेज › National › जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

Published On: Jul 16 2019 11:14AM | Last Updated: Jul 16 2019 11:19AM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. विशेष पोलिस पथकाने जम्मू आणि कश्मीर येथील श्रीनगरमधून एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. 

हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी सबंधीत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बसीर अहमद या नावाने त्याची ओळख पटली आहे. याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी याच वर्षी अटक केली होती. या दोघांची नावं फैयाज आणि मजीद बाबा अशी आहेत. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून त्याला अटक करण्यात आली आहे

एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या दहशतवाद्यावर २ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 

२००७ मध्ये दिल्ली पोलिसांसोबत झालेल्या एका चकमकीदरम्यान बशिरला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर खटलाही भरवण्यात आला, मात्र त्यातून तो सुटला. यानंतर दिल्ली हायकोर्टानेही बशीरला शिक्षा सुनावली होती. मात्र जामीन घेऊन बशिर कोर्टापुढे हजरच झाला नाही. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना मसूद अजहरने केली होती.