Tue, Aug 20, 2019 15:38होमपेज › National › 'मोदी विरोधकांसोबत असे वागतात की, ते पाकचे पीएम आहेत'

'मोदी विरोधकांसोबत असे वागतात की, ते पाकचे पीएम आहेत'

Published On: Feb 11 2019 3:34PM | Last Updated: Feb 11 2019 3:34PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहेत. आंध्र भवनमध्ये त्यांनी सकाळी ८ वाजता उपोषणाला प्रारंभ केला आहे. अनेक विरोधी पक्षाचे नेते त्यांना भेट देत आहेत. उपोषणस्थळी दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नायडू यांची भेट घेतली. त्यावेळीच केजरीवाल यांची जीभ घसरली. ते म्हणाले, विरोधी पक्षासोबत मोदी पाकिस्तानचे पतंप्रधान असल्यासारखे वागतात.

नायडू यांनी भेट दिली असता केजरीवाल म्हणाले, की मी पंतप्रधान यांना सांगू इच्छितो की, ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत, ते जनतेचे पंतप्रधान आहेत. मोदी विरोधी पक्षांशी असा व्यवहार करतात जसे की ते पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी करत नायडू आंध्र भवनमध्ये उपोषणाला बसले आहेत. अनेक नेत त्यांना भेट देऊन आपली बाजू मांडत आहेत.