होमपेज › National › Viral Video : आठ वर्षाच्या मुलीने राहुल यांना समजावले राफेल प्रकरण!

Viral Video : आठ वर्षाच्या मुलीने राहुल यांना समजावले राफेल प्रकरण!

Published On: Jan 11 2019 3:39PM | Last Updated: Jan 11 2019 3:39PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

देशात राफेल प्रकरणावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अधक्ष राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. हे राफेल वाद इतका मोठा झाला आहे की, या प्रकरणात लहान मुलांनीदेखील उडी घेतली आहे. एका आठ वर्षाच्या मुलीने राफेल प्रकरण काय आहे हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा हा व्हिडिओ निर्मला सीतारामन यांनी खुद्द आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये त्या आठ वर्षाच्या मुलीने कंपास पेटीचे उदाहरण देत राफेल प्रकरण समजावले आहे. मी राफेल प्रकरण सोप्या पद्धतीने समजावू इच्छिते. कंपासाची जी रिकामी बाजू आहे ती राहुल गांधी यांची आणि त्याची किंमत ७२० कोटी इतकी आहे. दुसरी बाजू नरेंद्र मोदी यांची आहे आणि ती अत्याधुनिक शस्त्रास्त्र्यांनी भरली आहे. त्याची किंमत १६०० कोटी इतकी आहे. राहुल गांधी यांना हे समजत नाही की, ते ज्या विमानाच्या किमतीसंदर्भात बोलत आहे ते केवळ रिकाम्या विमानाची किंमत आहे आणि मोदी शस्त्रासहित विमानाच्या किंमतीसंदर्भात बोलत आहेत.  

हा व्हिडिओ 'एक भारत श्रेष्ठ भारत' या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट झाला आहे. हा व्हिडिओ संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्या मुलीचे आभार मानले आहेत.