‘सरकारचे कामापेक्षा नाटकच जास्त’

Last Updated: Oct 09 2019 11:42PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

फ्रान्समध्ये राफेलच्या शस्त्रपूजेवरून भाजपा सरकार काम करण्यापेक्षा काम करण्याचे नाटकच जास्त करते, अशी टीका काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केली आहे. ते म्हणाले, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल घेताना उपस्थित राहण्याची काहीच गरज नव्हती. हे काम वायुदलाला करता आले असते. हे केवळ एक लढाऊ विमान आहे. विजयादशमी आणि राफेल विमान याची सांगड घालण्याचे काही कारण नाही. विजयादशमी सणाला तुम्ही राफेलशी का जोडत आहात? भाजप सरकारची हीच अडचण आहे. कामापेक्षा ते नाटकच जास्त करतात.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जेव्हा काँग्रेसने बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या, तेव्हा आम्ही असा ड्रामा केला नव्हता. यूपीए सरकारच्या कार्यकालात कुणीही नेता शस्त्रास्त्रे आणण्यासाठी गेला नाही.

तर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आचार्य प्रमोद म्हणाले की, संरक्षण मंत्री हिंदू आहेत म्हणून त्यांनी राफेलवर ओम लिहिले. ते मुस्लिम असते तर त्यांनी तिथे अजान दिली असती का? संविधानातून धर्मनिरपेक्ष शब्द हटविला पाहिजे, असे वाटू लागले आहे.