Sun, Sep 22, 2019 21:47होमपेज › National › घाबरू नका, खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियांका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

घाबरू नका, खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियांका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

Published On: May 21 2019 10:21AM | Last Updated: May 21 2019 10:21AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

लोससभा निवडणुकीच्या सातव्‍या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडले. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियांका गांधी -वधेरा यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देत  कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुम बाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन करत त्‍यांची हिम्‍मत वाढवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

रविवारी (ता.१९) लोकसभा निवडणुकीचे शेवटच्‍या आणि सातव्‍या टप्‍प्‍यातील मतदान झाले. यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यानंतर काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी यांनी कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असा  ऑडिओमार्फत संदेश दिला आहे.

तसेच, अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी सावधानता अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्‍या सरचिटणीस पदी निवड झाल्‍यापासून त्‍यांनी काँग्रसच्‍या प्रचाराची धुरा चांगलीच सांभाळली आहे. कार्यकर्ते, सर्वसामान्‍य जनता यांच्‍याशी संवाद साधत आसताना पाहायला मिळाली. याहीवेळी त्‍यांनी कार्यकत्‍यांची हिम्‍मत वाढवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.