Sun, Jun 07, 2020 10:34होमपेज › National › ‘चंद्रयान-२’चे १५ जुलै रोजी प्रक्षेपण : इस्रो

‘चंद्रयान-२’चे १५ जुलै रोजी प्रक्षेपण : इस्रो

Published On: Jun 12 2019 3:16PM | Last Updated: Jun 12 2019 3:47PM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने महत्वाकांक्षी ‘चंद्रयान-२’ मोहिमेची तारीख जाहीर केली आहे.  ‘चंद्रयान-२’चे प्रेक्षपण १५ जुलै रोजी पहाटे २.५१ वाजता होईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आज, बुधवारी दिली.

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनला यश आले आहे. आता चंद्रावर पोहोचण्यासाठी भारत आणि इस्रायल यांच्यात स्पर्धा आहे.

चंद्रावर पोहोचण्यासाठी चंद्रयान-१ वेळी जी पद्धत वापरली तीच चंद्रयान २ मोहिमेवळी वापरली जाईल. मात्र, पृष्ठभागावर अलगद उतरण्याची पद्धत वेगळी असेल, असे सिवन यांनी म्हटले आहे.

चंद्रयान २ मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोवर हे रोबोटिक आर्टिकल आहे. याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर तर आर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर असेल. लँडरला ऑर्बिटरच्या वरती ठेवले जाईल. लँडर, रोवर आणि ऑर्बिटर हे तिन्ही घटकांना एकत्रित GSLV mk lll या प्रक्षेपकामध्ये हीट शिल्डमध्ये ठेवले जाईल. त्याचे प्रक्षेपण १५ जुलै रोजी होईल, असे सिवन यांनी सांगितले.

हे यान चंद्रावर ६ ते ७ सप्टेंबर रोजी उतरेल, असेही ते म्हणाले.