Wed, Jul 08, 2020 04:24होमपेज › National › आदिवासींना मोठा दिलासा; वन कायद्यातील सुधारणांचा मसूदा मागे

आदिवासींना मोठा दिलासा; वन कायद्यातील सुधारणांचा मसूदा मागे

Last Updated: Nov 15 2019 3:26PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा

वन कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचा मसुदा केंद्र सरकारने मागे घेतला असून यामुळे आदिवासी आणि जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आदिवासी आणि वन उत्पादनांवर अवलंबून असणार्‍यांचे अधिकार हिरावून घेण्याचा सरकारचा कोणताही मानस नसल्याचेही जावडेकर यांनी नमूद केले. 

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून वन कायद्यातील प्रस्तावित सुधारणांचा मसुदा मागे घेत असल्याचेही जावडेकर म्हणाले. वन कायद्यातील सुधारणांना अनेक राज्यांनी मोठा विरोध केला होता. हा अधिकार्‍यांनी तयार केलेला मसुदा असून सरकारचा मसुदा नसल्याचे स्पष्टीकरण जावडेकर यांनी वारंवार दिले होते. वन कायद्यात सुधारणा करुन केंद्र सरकार आदिवासी तसेच जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांचे अधिकार हिरावून घेणार असून या लोकांच्या ताब्यातील जमिनी हिसकावून घेतल्या जाणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.