टेलिकॉम कंपन्यांना केंद्राचा दिलासा

Last Updated: Nov 21 2019 1:44AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

तोट्याचा सामना करत असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले, की कंपन्यांवरील वाढत्या आर्थिक दबावामुळे कंपन्यांना स्पेक्ट्रम लिलावाचा हफ्ता भरण्यापासून दोन वर्षे सवलत देण्यात आली आहे. 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), भारतीय जहाजरानी महामंडळ, कॉनकोरसह पाच सार्वजनिक उपक्रमांतून सरकारचा वाटा विकण्याला परवानगीही देण्यात आली आहे. सार्वजनिक उपक्रमामधील सरकारचा वाटा 51 टक्क्यांपेक्षा कमी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

नुमालीगड रिफायनरीला बीपीसीएलपासून वेगळे करण्यात येणार आहे. नंतर सरकार पेट्रोलियम कंपनीतील आपला 53.29 टक्के वाटा विकायला काढणार आहे. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, उत्तर पूर्व इलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशनमधील आपला वाटा सरकार एनटीपीसी लिमिटेडला विकणार आहे.