Mon, Aug 26, 2019 08:11होमपेज › National › बायकोची पकडली नवऱ्याने चोरी, प्रियकराने मारली जीवघेणी उडी

बायकोची पकडली नवऱ्याने चोरी, प्रियकराने मारली जीवघेणी उडी

Published On: May 16 2019 4:19PM | Last Updated: May 16 2019 4:26PM
नवी दिल्ली - पुढारी ऑनलाईन

कथा कादंबऱ्यात वाचनात येणाऱ्या गोष्टी अलिकडच्या काळात सत्यात घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना नुकतीच राजधानी दिल्लीत घडली. एक तरुण आणि तरुणी प्रेमामध्ये मश्गुल होते. मात्र यांचे चाळे या तरुणीचा पती पाहात आहे याची या जोडप्याला कल्पनाही नव्हती. मात्र तरुणीचा पती हे चाळे पाहात आहे असे तिच्या प्रियकराच्या लक्षात आले त्यानंतर त्याची पळता भुई थोडी झाली. नवऱ्याच्या तावडीतून सुटण्यासाठी या युवकाने तब्बल पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. यातून तो वाचला मात्र त्याची स्थिती बिकट होती. हाडे मोडल्याने आणि इतर जखमांनी अखेर त्याचा जीव घेतला.

दिल्लीतल्य तिगडी भागात हा प्रकार घडला. मात्र या घटनेत पोलिसांना वेगळाच संशय आला आहे. या तरुणाने स्वतः उडी मारली नसावी तर त्याला ढकलून दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे  पोलिस या शक्यतेचा कसून तपास करत आहेत.

दक्षिण दिल्लीतल्या या भागात जे जे कॉलनीमध्ये पाचव्या मजल्यावर या तरुणीचे घर होते. याच घरात दोघांचे गुफ्तगु चालले होते. त्यांना या तरुणीच्या पतीन नको त्या अवस्थेत पाहिल्याने हा सर्व प्रकार घडून आला. मात्र असेही सांगण्यात येत आहे की या प्रकरणाची कुठेही वाच्याता होऊ नये यासाठी पतीने दोघांना कोंडून घातले. त्यावेळी भांबावलेल्या प्रियकराने बाहेर पडण्याच्या नादात तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला. या मृताचे नाव पंकज असे आहे. तो जेजे कॉलनीतल्याच दुसऱ्या एका इमारतीत राहात होता. यामध्ये आता नेमके काय घडले हे मात्र पोलीस तपासातच निष्पन्न होईल.