Thu, Jan 17, 2019 08:08होमपेज › National › मालवाहू जहाजाला भीषण आग

मालवाहू जहाजाला भीषण आग

Published On: Jun 14 2018 7:03PM | Last Updated: Jun 14 2018 6:52PMकोलकाता : वृत्तसंस्था

कृष्णपटनम येथून कोलकाताला जाणार्‍या एमव्हीएसएसएल या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते. पैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ही आग लागली. जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी हलदिया येथून मदत पाठवण्यात आली आहे. खराब हवामान आणि वेगाने वारे वाहत असल्याने आग वेगाने वाढली. 

पश्‍चिम बंगालमधील हलदियापासून सुमारे 60 नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होते. आगीची माहिती समजताच भारतीय तटरक्षक दलाने राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर विमान बचावकार्यासाठी पाठवले. जहाज जवळपास 70 टक्के जळून खाक झाले.