Mon, Mar 25, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › National › 'त्या' पाच जणांची नजरकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढली

'त्या' पाच जणांची नजरकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढली

Published On: Sep 12 2018 2:01PM | Last Updated: Sep 12 2018 1:59PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील 'त्या' पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत त्या पाचजणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. 

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. मागील महिन्यात  सामाजिक कार्यकर्ते असलेल्या वरवरा राव, वर्नोन गोन्सालविस, अरुण फेरिया, सुधा भारद्वाज  आणि गौतम नावलखा यांना एल्गार परिषदेप्रकरणी  पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. या अटकेला रोमिला थापर यांच्यासह काही विचारवंतानी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने असहमत असणे हा लोकशाहीसाठी सेफ्टी व्हॉल्व्ह असल्याचे म्हटल होते. त्यामुळे त्याला परवानगी नाही दिली तर प्रेशर कुकर उडेल अशा शब्दात पुणे पोलिसांचे कान सर्वोच्च न्यायालयाने उपटले होते. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी  पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने  कडक ताशेरे ओढले होते.