Tue, Jun 25, 2019 15:10होमपेज › National › 'सगळे एकत्र आले तरी भाजपला फरक पडत नाही'

'सगळे एकत्र आले तरी भाजपला फरक पडत नाही'

Published On: Jan 12 2019 1:53PM | Last Updated: Jan 12 2019 2:27PM
नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरण संपूर्ण बदलली आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडी झाल्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे. या आघाडीनंतर भाजपने प्रतिक्रिया दिली. 

वाचा : अखेर सायकलवर हत्ती विराजमान; उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा प्रत्येकी ३८ जागांवर लढणार

भाजप प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी म्‍हणाले,की या दोन पक्षानी आपली राजकीय जमीन वाचविण्‍यासाठी महाआघाडी करुन एकत्र निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. याच पक्षांकडून यापूर्वी एकमेकांवर खूनाचे आरोप करण्‍यात आले. मात्र, हा त्‍यांचा निर्णय आहे. आम्‍हाला आत्‍मविश्‍वास आहे. सर्वपक्ष जरी एकत्र आले, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्‍हीच जिंकणार आहे. 

वाचा: 'पीएम मोदी आणि अमित शहा या गुरु चेल्यांची झोप उडवणारी पत्रकार परिषद'

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडीवर मध्‍यप्रदेशचे मुख्‍यमंत्री कमलनाथ यांनी देखील प्रतिक्रिया दिली. आज देशाला अशाच महाअघाडीची गरज आहे. २०१४ च्‍या निवडणुकीत भाजपने केवळ ३१ टक्‍के मते मिळवली. मात्र भाजपने हा जनतेचा कौल असल्‍याचा दावा केला. मतांचे विभाजन झाल्‍यामुळे ते झाले होते, असे मध्‍य प्रदेशचे मुख्‍यमंत्री कमलनाथ म्हणाले.

भाजपच्‍या हरण्‍याची सुरुवात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून झाल्‍याचे प्रतिक्रिया राष्‍ट्रीय जनता दलाचे तेजस्‍वी यादव यांनी  उत्तर प्रदेशमधील महाअघाडीवर शिकामोर्तब झाल्‍यावर दिली आहे. 

वाचा : अब की बार, फिर मोदी सरकार

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनी संयुक्‍त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप आणि आघाडीची घोषणा केली आहे. प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहेत. या महाआघाडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रस्तावित आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी हा जबर हादरा मानला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशने 'भक्कम' साथ दिल्यानेच भाजपला सत्तेचा सोपान गाठण्यात यश आले.

या संभाव्य घडामोडींमुळे मोदींनी पुर्वोत्तर राज्यांकडे मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.