Sun, Feb 23, 2020 15:16होमपेज › National › 'मोदींच्या नावाने काही तरी असू द्या, जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करा' 

'मोदींच्या नावाने काही तरी असू द्या, जेएनयूचं नाव बदलून एमएनयू करा' 

Published On: Aug 18 2019 2:30PM | Last Updated: Aug 18 2019 2:30PM

खासदार हंसराज हंसनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय जनता पक्षातील नेत्यांचा आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एकुण वातावरणाबद्दल विळ्या भोपळ्यांचे संबंध जगजाहीर आहेत. आता त्या विद्यापीठाचे (जेएनयू) नावच बदलण्याची मागणी भाजप खासदाराने केली. दिल्लीतील भाजप खासदार हंसराज हंस यांनी जेएनयूचे नाव बदलून मोदींचे नाव द्यावे अशी मागणी केली. 

हंसराज हंस यांनी जेएनयूचे नाव बदलण्यासाठी सल्ला देताना म्हणाले, की जेएनयूचे नाव बदलून एमएनयू करावे. मोदींच्या नावावर देखील काहीतरी असायला हवे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हद्दपारीचे समर्थन केले. 

हंसराज हंस पुढे म्हणाले, आता काश्मीरचा विकास होईल. आमच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या चुकांची शिक्षा आम्ही भोगत आहोत. हंसराज हंस यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  भाजपमध्ये प्रवेश केला होता.