सुन्नी वक्फ बोर्ड निर्णयावर समाधानी नाही

Last Updated: Nov 09 2019 12:25PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 'सर्वोच्च' निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. कोर्टाने रामलल्लाचं कायदेशीर अस्तित्व मान्य केले आहे. अयोध्येतच सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने ३-४ महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर मुस्लिम पक्षकारांनी या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो पण समाधानी नाही. यासंदर्भात आम्ही विचार करू, असे सुन्‍नी वक्‍फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अयोध्या प्रकरणात कोर्टाने सुन्नी वफ्फ बोर्डाचा दावा फेटाळला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाची आहे, असे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. कोर्टाने रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्व मान्य केले असून मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा द्यावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. या निर्णयानंतर मुस्लिम पक्षकारांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला आहे. परंतु, आम्ही असमाधानी आहोत. आम्हाला अपेक्षित निकाल आला नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी चर्चा करून निकालाला आव्हान देण्याबाबत ठरवू. पुनर्विचार याचिकेवर वकिलांशी चर्चा करून ठरवू, असेही सुन्‍नी वक्‍फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले.