Thu, Jul 19, 2018 19:17होमपेज › National › आंध्र प्रदेश : गॅस गळतीने सहा जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश : गॅस गळतीने सहा जणांचा मृत्यू

Published On: Jul 12 2018 8:52PM | Last Updated: Jul 12 2018 8:52PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील ताडीपार्थी येथील गेरदाऊ स्टील इंडिया लि. प्लॅन्टमध्ये विषारी वायुच्या गळतीने सहा कामगारांचा मृत्यू झाला. दोन आठवड्यांच्या दुरुस्तीनंतर चेंबरच्या तपासणीचे काम सुरू होते त्यावेळी गॅस गळती झाल्याने कामगारांना जीव गमवावा लागला. 

चेंबरच्या दुरुस्तीवेळी कार्बन मोनॉक्साईडचा वापर केला होता. त्याचा कामगारांना श्वास घेताना त्रास झाला. श्वसनाचा त्रास झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघांनी सरकारी रुग्णालयात प्राण सोडला. या भीषण दुर्घटनेमध्ये दोघे गंभीर असून त्यांना उपचारासाठी अनंतपुर सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.