Wed, Apr 01, 2020 08:01होमपेज › National › केजरीवाल, सिसोदियांच्या विजयाला दिल्‍ली हायकोर्टात आव्हान  

केजरीवाल, सिसोदियांच्या विजयाला आव्हान  

Last Updated: Feb 28 2020 2:02AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाला पराभूत उमेदवार प्रताप चंद्र यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रताप चंद्र यांनी केजरीवाल व सिसोदिया यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. केजरीवाल व सिसोदिया यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा याचिककर्त्याचा दावा आहे.

अधिक वाचा : राजस्थान : २४ आप्त गमावल्‍याचं दु:ख पचवत बापनं लावलं मुलीचं लग्‍न

याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती व्ही. के. राव यांनी निवडणूक आयोगाची मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग समिती, निवडणूक अधिकारी तसेच सिसोदिया यांना नोटीस बजावली आहे. प्रताप चंद्र यांनी एकूण दोन याचिका दाखल केल्या आहेत. केजरीवाल यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कोणताही आदेश दिलेला नाही. 

अधिक वाचा : दिल्लीत हिंसाचार पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर; ५० मोबाईल जप्त

मतदान पार पडण्याच्या 48 तास आधी प्रचार केला जाऊ नये, असा नियम आहे पण हा नियम धाब्यावर बसवून केजरीवाल आणि सिसोदिया यांनी त्या वेळेत प्रचार केल्याचे प्रताप चंद्र यांचे म्हणणे आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांनी विजय प्राप्त केलेल्या मतदार संघातील निवडणूक अवैध ठरवून त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली जावी, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.