Fri, Nov 24, 2017 20:18होमपेज › National › गुड न्यूज : ‘जीएसटी’त आणखी कपात!

गुड न्यूज : ‘जीएसटी’त आणखी कपात!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) रचनेत आणखी बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. 1 जुलैपासून देशात लागू करण्यात आलेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीची घडी अद्याप व्यवस्थित बसलेली नाही. त्यामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘जीएसटी’ कौन्सिलकडून ‘जीएसटी’मध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत आहेत. दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘जीएसटी’मध्ये अजून काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

सरकारच्या महसुलाचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच शुक्रवारी 200 हून अधिक वस्तूंवरील ‘जीएसटी’मध्ये करण्यात आलेल्या कपातीचा गुजरात निवडणुकीशी संबंध जोडणार्‍यांवरही जेटली यांनी टीका केली.जेटली म्हणाले, ‘जीएसटी’वरून काहीजण बालिश राजकारण करीत आहेत. ‘जीएसटी’मध्ये कपात करणे शक्य होते. त्यामुळे आम्ही चार महिन्यांमध्ये 28 टक्के ‘जीएसटी’ असलेल्या स्लॅबमध्ये बदल केले आहेत.