Thu, Mar 21, 2019 00:55होमपेज › National › महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली

महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली

Published On: Mar 13 2018 12:05PM | Last Updated: Mar 13 2018 12:11PM जोधपूर : पुढारी ऑनलाईन

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. बच्चन यांना नक्की काय झाले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन सध्या जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतून चार्टर विमानाने १० डॉक्टरांची टीम जोधपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. डॉक्टर जोधपूरला पोहोचल्यानंतर अमिताभ बच्चन यांची तपासणी करतील. त्यानंतर पुढील उपचारासंदर्भातील निर्णय घेतला जाईल.

 चार दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने अमिताभ बच्चन यांना लिलावती रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. उपचारानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी  प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती.