Thu, Aug 22, 2019 14:40होमपेज › National › राहुल गांधी 'भारतीय'च; अमेठीतून अर्ज वैध 

राहुल गांधी 'भारतीय'च; अमेठीतून अर्ज वैध 

Published On: Apr 22 2019 3:38PM | Last Updated: Apr 22 2019 3:38PM
अमेठी : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भारतीय नसल्याचा आक्षेप अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांनी  घेतला होता. निवडणूक आयोगाने त्यांचा आक्षेप फेटाळून राहुल यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांचा अमेठीतून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

उमेदवारी अर्जाला आक्षेप घेण्यात आल्यानंतर दोन्ही  बाजूच्या वकिलांकडून युक्तीवाद ऐकून घेण्यात आला. दोन्हीकडील बाजू ऐकून घेण्यात आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी राहूल यांच्या बाजूने निकाल देत दिलासा दिला. 

ध्रुवलाल यांनी राहुल यांनी इंग्लंडस्थित एका कंपनीच्या कागदपत्रांमध्ये ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले आहे. विदेशी व्यक्ती येथून निवडणूक लढवू शकत नाही असा आक्षेप घेतला होता. राहुल यांच्या पदवीवरूनही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.