अयोध्या खटल्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका : एआयएमपीएलबी

Last Updated: Nov 17 2019 4:20PM
Responsive image


लखनऊ : पुढारी ऑनलाईन

अयोध्या खटल्याच्या  निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) घेतला आहे. आज लखनऊ येथे तीन तास झालेल्या बैठकीत हा निर्णयब घेण्यात आला. 

बोर्डाने म्हटले आहे की, आम्ही अयोध्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. मशिदींच्या जागेच्या व्यतिरिक्त मुस्लिम समाज इतर कोणतीही जमीन स्वीकारू शकत नाहीत. मशिदीसाठी अन्य कोणतीही जमीन मंजूर नाही. ‘जमीअतुल उलामा ए हिंद’चे अध्यक्ष अरशद मडनी यांचे म्हणणे आहे की, मशीद स्थलांतर होऊ शकत नाही. दुसरी जागा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निकालात अनेक विरोधाभास आहेत. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोर्डाच्या सदस्यांनी माध्यमांना ही माहिती दिली.