Tue, Oct 24, 2017 16:51होमपेज › National › एअरटेलचा १३९९ रुपयात स्मार्टफोन

एअरटेलचा १३९९ रुपयात स्मार्टफोन

Published On: Oct 12 2017 12:23PM | Last Updated: Oct 12 2017 2:58PM

बुकमार्क करा

नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

जिओला टक्कर देण्यासाठी इतर सर्व टेलिकॉम कंपन्या चांगल्याच कंबर कसत आहेत. यामध्ये आता एअरटेलने कार्बन मोबाइल कंपनीच्या सहकार्याने १३९९ रुपयांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कार्बन A ४० नावाचा हा फोन शुक्रवारपासून ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

जिओ फोनप्रमाणेच हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक कॅशबॅक आणि डेटा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना सुरूवातीला २८९९ रूपये द्यावे लागणार आहेत. या फोनच्या सेवा मिळवण्यासाठी सलग ३६ महिने १६९ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर १८ व्या महिन्यात ५०० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तर ३६ महिन्यांनंतर उर्वरित १ हजार रुपयेही कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे २८९९ रुपयांवर दोन टप्प्यावर एकूण १५०० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅकमुळे हा फोन ग्राहकांना १३९९ रुपयांनाच मिळणार आहे.     

१६९ च्या रिचार्जवर ४G डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

हा फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना १६९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा रिचार्ज केल्यानंतर २८ दिवसांसाठी दररोज ५१२MB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल.

कार्बन A४० चे फीचर्स

अँड्रॉईड ७.० नॉगट, ४ इंच आकाराची स्क्रीन, १ जीबी रॅम, 8 जीबी इंटर्नल स्टोरेज, १.३GHz प्रोसेसर, २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १४००mAh क्षमतेची बॅटरी, ड्युअल सिम स्लॉट