Sun, Aug 25, 2019 01:32होमपेज › National › एअर इंडियाच्या विमानाला आग

एअर इंडियाच्या विमानाला आग

Published On: Apr 25 2019 10:56AM | Last Updated: Apr 25 2019 11:11AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीमधील इंदिरा गांधी विमानतळावर बुधवारी रात्री मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या बोईंग विमानाच्या मागील बाजूला अचानक आग लागल्याने विमानतळावर एकच खळबळ माजली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

एअर इंडियाचे विमान B777-200 LR दिल्लीतून अमेरिकेतील सॅन फ्रांसिस्को येथे रवाना होणार होते. उड्डाण होण्यापूर्वी विमानतळावर विमानाच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच विमानाच्या मागील बाजुने अचानक पेट घेतला. यावेळी सुदैवाने एकही प्रवाशी विमानात नव्हता.

#WATCH Air India Delhi to San Francisco (Boeing 777) flight caught fire in Auxiliary Power Unit (APU) yesterday at Delhi airport. Fire started during AC repair. Air India terms it minor incident, plane was empty at the time of repair work, fire was doused immediately. pic.twitter.com/Og790FVABE

— ANI (@ANI) April 25, 2019

दुरस्ती केल्यानंतर विमान उड्डाण करणार होते. मात्र अचानक आग लागल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. यासंर्भात बोलताना एअर इंडियाने सांगितले की, उड्डाण करण्यापूर्वी इंजिनियर रूटीन चेकिंग करत होते. त्यावेळी अचानक मागील बाजूस आग लागली. या घटनेनंतर विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे.